बातमी कट्टा:- 25 वर्षीय तरुणाने शहर पोलीस स्टेशनच्या बाहेर विषारी औषध घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.चोरीच्या गुन्ह्यात पोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांनी या तरुणाचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे सांगितले होते. गुन्ह्यात नाव गोवले जाण्याचा भीतीने त्याने विष प्राशन केल्याचे त्याला रूग्णालयात दाखल केलेल्या मित्राने सांगितले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार काल दि 22 रोजी शहरातील के.जी.मिल रोड येथील तरुण मुबारक शब्बरी शाह वय 25 हा टेम्पो चालक आहे.दि 17 रोजी निमझरी रस्त्यावरील फार्ममधून 12 शेळ्या चोरी झाल्याचा गुन्हा दाखल होता त्या बाबत शहर पोलीसांकडून चौकशी सुरु होती. याप्रकरणी पोलीसांनी दोन ते तिन संशयितांना ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान त्या तिघांनी या गुन्ह्यात मुबारकचा सहभाग असून मुबारख शेख याने टेम्पोतून त्या चोरीच्या शेळ्यांची वाहतूक केल्याची माहिती दिल्याने पोलीसांनी मुबारक याला चौकशी साठी बोलवले होते.फोलीसांच्या ताब्यात असलेल्या संशयितांनी या गुन्ह्यात मुबारकचे घेतल्याने आपले नाव येईल या भीतीने मुबारक याने पोलीस स्टेशन बाहेर कागदाच्या पुडीत आणलेले पावडर व उंदीर मारण्याणे रतोक्स नावाची विषारी क्रिम घेतले.उपस्थितांनी तात्काळ मुबारक याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व तेथे उपचार करण्यात आले. शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातून मुबारक याला धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.