बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यात साथीच्या आजारांनी कहर केला आहे.डेंग्यू सदृष्य आजारांसह सर्दी,खोकला,थंडी तापाचे प्रमाण वाढल्याने शहरातील खाजगी दवाखान्यांमध्ये देखील रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघावयास मिळत आहे .तालुक्यात एकुण 153 डेंग्यू सदृष्य लक्षणे असलेले रुग्ण आढळून आले आहेत यात शिरपूर शहरातील संख्या 95 ईतकी आहे. तालुक्यात साथीच्या आजाराने कहर केले असल्याने शिरपूरकर हैराण झाले आहेत.
गेल्या दोन वर्ष शिरपूर तालुक्यात कोरोनाने कहर केला होता. कोरोनात शिरपूर तालुक्यातील 104 रुग्णांना आपला जिव गमवावा लागला होता.अशा मोठ्या संघर्षमय परिस्थितीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणाने प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत तालुक्यातून कोरोना हद्द पार केला आहे.आरोग्य विभागाकडून आज देखील लसीकरणातून किंवा व ईतर गोष्टीतून तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सांभाळत आहेत. मात्र आता कोरोनानंतर तालुक्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहेत.संपूर्ण शिरपूर तालुक्यात डेंग्यू सदृष्य आजाराचे एकुण 153 रुग्ण असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. तर एकट्या शिरपूर शहरात डेंग्यू सदृष्य आजाराच्या लक्षणे असलेले 95 रुण आढळून आले आहेत.
याबाबत आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावा गावी फेर्या सुरु करण्यात येत असून सर्वे करत फवारणी करण्यात येत आहे. डेंग्युची उत्पत्ती होईल अशा ठिकाणे नष्ट करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायत विभागाला फवारणी बाबत सुचना करण्यात आल्या आहेत.काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आसल्याने त्यांच्या बाबत कुठलीही माहिती प्राशसनाला मिळु शकत नसल्याने त्यांची नोंद करण्यात येत नाही.
आपला परिसर स्वच्छ ठेऊन डेंग्यू बाबतचे उपाययोजना कराव्यात,डेंग्यू उत्पत्ती असलेले स्थाने नष्ट करावे व लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. डेंग्यूसह साथीचे आजार ताप,सर्दी,खोकला देखील मोठ्या प्रमाणात नागरीकांमध्ये दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य बजावत आहे मात्र आपण देखील आपले कर्तव्य योग्य पध्दतीने काळजीपूर्वक बजावणे गरजेचे आहे.