स्मार्ट शिरपूरचा “डंका” वाजण्यापेक्षा जनतेला “डेंग्यूच्या डंख” पासून वाचवा…

बातमी कट्टा:- स्मार्ट शिरपूरचा डंका सर्वत्र वाजवणारे नेत्यांनी आता शहरातील नागरीकांना डेंग्यूच्या डंख पासून वाचविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शिरपूर शहरात डेंग्यू सदृष्य आजारासह सर्दी,खोकला,ताप सारख्या साथीच्या आजारांनी कहर केला आहे.तीन ते चार वर्षापूर्वी शिरपूर शहरातील दोन लहान 13 वर्षीय चिमुकल्यांना डेंग्यूमुळे जिव गमवावा लागला होता.त्यावेळी नगरपालिका प्राशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. शिरपूर शहरात आता पुन्हा साथीच्या आजारांनी कहर सुरु केला आहे.याबाबत पोकळ प्रेम दाखवणारे नेतेंनी ग्राऊंड लेवलवर येऊन काम करणे गरजेचे आहे.कारण शिरपूर शहरात 95 डेंग्यू सदृष्य आजाराचे लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेने अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत.स्वच्छता पासून तर स्मार्ट शिरपूरचा दर्जा देण्यात आला आहे.मात्र या स्मार्ट शहरातील जनतेच्या आरोग्यबाबत काय ? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण शिरपूर शहरात डेंग्यू सदृष्य आजारांसह साथीच्या आजारांनी कहर केला आहे.शहरात डेंग्यू सदृष्य लक्षणे असलेले 95 रुग्णांची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र काही रुग्ण खाजगी उपचार घेत असल्याने त्यांची नोंद होत नाही.

चार ते पाच वर्षा पुर्वी याच शिरपूर शहरातील 13 वर्षीय लहान मुलांचा डेंग्यू आजाराची लागण झाल्याने मृत्यू झाला होता.घाबरून न जाता नागरिकांनी लक्षणे जाणवल्यास उपचार घेणे गरजेचे आहे.मात्र याबाबत संबधित नेते मंडळी व अधिकारी मंडळींनी डेंग्यूच्या रुग्णांची संख्या सर्वांसमोर मांडत याबाबत उपाययोजना करणे आवश्यक आहे.

सुंदर शिरपूर स्वच्छ शिरपूर म्हणून घेणाऱ्या नेतेंनी आपल्या शहरात वाढणारे डेंग्यू सदृष्य आजारांसह साथीच्या आजारांबाबत निव्वळ पोकळ प्रेम न दाखवता ग्राऊंड लेवल वर काम करणे गरजेचे आहे.अशी अपेक्षा शिरपूर शहरातील आम जनतेची आहे.

WhatsApp
Follow by Email
error: