शिरपूर तालुक्यातील “यांना” मिळाला”आदर्श” सरपंच पुरस्कार…

बातमी कट्टा:- कोल्हापूर येथे झालेल्या सरपंच सेवा संघातर्फे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने शिरपूर तालुक्यातील करवंदच्या लोकनियुक्त महिला सरपंच मनीषा पाटील यांना सन्मानित करण्यात आले आहे.

सरपंच सेवा संघातर्फे नुकताच कोल्हापूर येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. यासाठी अभिनेता तसेच सह्याद्री देवराई वृक्षलागवडीचे प्रणेते सयाजी शिंदे व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष यादवराव पावसे यांच्यासह पदाधिकारींच्या उपस्थितीत होते.यावेळी गावात केलेली विकासकामे, शासकीय योजनांची अमलबजावणी, परिसरात केले वृक्षारोपण,शुध्द पेयजल योजना व गावातील सामाजिक घटकांना दिलेल न्याय या सर्व बाबींचा विचार करून सरपंच सेवा संघातर्फे शिरपूर तालुक्यातील करवंद येथील लोकनियुक्त महिला सरपंच मनीषा पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: