बातमी कट्टा:- भरदुपारी घरफोडी करत घरातील तरुणावर चाकू हल्ला केल्याची घटना काल दि 29 रोजी दुपारी 2ते 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.चोरट्यांना विरोध केल्याने घरातील तरुणावर चोरट्यांनी चाकू हल्ला केला मात्र तो त्यात बालंबाल बचावला आहे. यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिरपूर शहरात चोरींच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे हॉटेल चंद्रमा येथे हॉटेलचे शेटर फोडून 33 हजारांची रोकड चोरी झाल्याची घटना रात्री घडली होती.मात्र त्याच दिवशी दि 29 रोजी दुपारी शिरपूर शहरातील शंकुतला लॉन्सच्या पाठीमागे शंकर पांडू माळी नगर येथील प्रकाश हरी माळी यांच्या येथे घरफोडी झाली.यादरम्यान घरातील तरुण मुलगा घरी आला तेव्हा त्याने विरोध केला असता चोरट्यांनी तरुणावर देखील मारहाण करून चाकू हल्ला करत पळ काढला यात तरुण थोडक्यात बचावला.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार प्रकाश माळी हे वनपाल म्हणून शिरपूर येथील वनखात्यात बोराडी येथे कार्यरत आहेत. ते दि 29 रोजी बोराडी येथे ड्युटी वर गेले त्यानंतर मुलगा अनुज हा देखील घराबाहेर गेला होता तर प्रकाश माळी यांची पत्नी दुपारी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाजारपेठेत गेल्या होत्या.दुपरी घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला.तर एक चोरटा बाहेर मोटरसायकली जवळ थांबून पाहरा देत थांबला.काही वेळानंतर प्रकाश माळी यांचा मुलगा अनुज माळी हा घरी परतला.बाहेर मोटरसायकली जवळ उभ्या असलेल्या चोरट्याला कोण आहे अशी विचारणा केली.त्यावर चोरट्याने साहेब घरात आहेत काय काम आहे अशी उलट विचारणा केली.अनुजला संशय आल्याने त्याने घरातील चोरट्यावर दगड मारुन फेकला.हे पाहून घरातील एक व बाहेरील दोघांनी अनुजवर लोखंडी टॅमीने मारहाण करीत चाकू हल्ला केला मात्र त्यात अनुज थोडक्यात बचावला व खाली पडला यामुळे तीनही संशयित मोटरसायकलीने तेथून पसार झाले.
चोरट्यांनी घरातील कपाटातील रोकड व सोने चांदीचे दागिने लांबिवले असल्याची माहिती मिळाली आहे. या भरदिवसा घरफोडी च्या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.