बातमी कट्टा:- धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नदी – नाल्यांना पूर आले. पुरामुळे नदी, नाल्य काठावरील शेतांची दुर्दशा झाली आहे. पुराने शेती खरडून गेली आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी खचून जावू नये. शासन अशा संकटसमयी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा धीर राज्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज शेतकऱ्यांना दिला. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे, हातनूर, धावडे शिवारात झालेल्या शेती नुकसानीची पाहणी केली.