बातमी कट्टा:- तिन तीघाडी महाआघाडी सरकार वरील संताप जनतेने व्यक्त केला,ओबीसी बद्दल बोललो म्हणून विधानसभेत एक वर्षासाठी 12 आमदारांना सस्पेंड केल.मात्र जनता भाजप सोबत आहेत आणि त्यांनी मतदानातून दाखवून दिले अशी टिका माजी मंत्री आमदार जयकुमार रावल ?
मंगळवारी झालेल्या पोटनिवडणुकीत शिंदखेडा तालुक्यात चार गटांसाठी 11 उमेदवार तर 5 गणांसाठी 10 उमेदवार रिंगणात होते.आज दि 6 रोजी मतमोजणी झाली यात शिंदखेडा तालुक्यात भाजप पक्षाने तीन गटात व चार गणांमध्ये बाजी मारली आहे तर एका गटात व एका गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे.या निवडणूकीच्या निकालानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावलांनी प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी महाआघाडी सरकारवर टिका केली आहे.