दसराच्या दिवशी युवकाची आत्महत्या, शनिवारी आढळून आला मृतदेह….

बातमी कट्टा:- दसराच्या दिवशी सावळडे येथील तापी नदी पुलावरून नदी पात्रात तालुक्यातील गरताड येथील 23 वर्षीय तरुणाने उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली असून आज शनिवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सदर तरुणाचा मृतदेह नदी पात्रात आढळून आला आहे.ऋषिकेश राजेंद्र पाटील वय 23 रा.गरताड ता शिरपूर जि. धुळे.असे मयत तरुणाचे नाव असून आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.


याप्रकरणी उपजिल्हा रुग्णालयातील वार्डबॉय लखन भुसिंगे यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.दिलेल्या खबरीनुसार गरताड येथील ऋषिकेश राजेंद्र पाटील या 23 वर्षीय तरुणाने काल 15 ऑक्टोबर रोजी 3 वाजेच्या सुमारास सावळडे जवळ तापी नदी पुलावरून नदी पात्रात उडी घेतली होती.दरम्यान तपास सुरू असतांना शनिवारी सकाळी 11 वाजता नदी पात्रात मृतदेह तरंगताना आढळून आला असुन गरताडचे सरपंच किरण सुधीर शिंदे यांनी 11:30 वाजता शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉ शशिकांत पाटील यांनी तपासणी करून मयत घोषित केले.दिलेल्या खबरीवरून शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.शहर पोलिसांकडून पुढील तपास करीत आहेत.

WhatsApp
Follow by Email
error: