बातमी कट्टा:- 152 वर्षांची परंपरा असलेल्या खालचे गाव श्री तिरुपती बालाजी मंदीराचा रथोत्सव काल दि 16 रोजी शनिवारी उत्साहात साजरा करण्यात आला.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाश्र्वभूमीवर यावर्षी देखील रथोत्सव गावात न फिरवता दिवसभर एकाच ठिकाणी उभा करण्यात आला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी देखील शिरपूर येथे श्री तिरुपती बालाजी मंदिराचा रथोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.रथोत्सव गावात न फिरवता दिवसभर एकाच ठिकाणी एकाच ठिकाणी दर्शानासाठी रथ उभा करण्यात आला होता.शिरपूर प्रांताधिकारी प्रमोद भामरे,तहसीलदार आबा महाजन यांनी सपत्नीक रथपूजन केले.संस्थानाचे अध्यक्ष भुपेशभाई पटेल,माजी नगराध्यक्ष प्रभाकर चव्हाण ,शिरपूर पिपल्स बँकचे माजी अध्यक्ष राजगोपाल भंडारी आणि विश्वस्त मंडळाने संयोजन केले.
सजविलजे पालखीतून श्री बालाजी महाराजांची मूर्ती रथावर नेण्यात आली.रथोत्सवानिमीत्त रथाला शृंगारण्यात आले होते तर परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.

