आ.कुणाल पाटील यांच्यामुळे धुळे तालुक्यांची शाश्‍वत विकासाकडे वाटचाल- जि.प.सदस्य किरण पाटील

बातमी कट्टा:- धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच तालुक्याचा शाश्वत विकास घडत असून त्यांच्या पाठपुराव्यामुळे विविध विकास कामांना गती मिळालेली आहे. म्हणून अशा विकासाभिमुख, लोकाभिमुख नेतृत्वमागे व काँग्रेस पक्षामागे जनतेने खंबीरपणे ताकदीने उभे रहावे असे आवाहन जि.प.सदस्य किरण पाटील  यांनी केले. 

           
      आमदार कुणाल पाटील यांच्या प्रयत्नाने नवलनगर- नावरा नावरी- सातरणे-मोहाडी प्र.डा.  रस्त्याच्या नूतनीकरण व डांबरीकरणाच्या कामास मंजुरी मिळाली असून या कामाचा आज दि.19 ऑक्टोबर रोजी सातरणे ता.धुळे येथे  मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिप सदस्य किरण पाटील यांनी सांगितले की, आमदार कुणाल पाटील यांनी शेवटच्या माणसाचा विचार करून विकासाचे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. चुकीची माणसे निवडून आली तर विकास खुंटत असतो. म्हणून धुळे तालुक्यात आमदार कुणाल पाटील यांच्या रूपाने आपल्याला चांगले आमदार मिळाले असून त्यांच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.  शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवून त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम धुळे तालुक्यात केले जात आहे. धुळे तालुक्यातील प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडविण्यासाठी जे कामे करावी लागतील ते आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आपली सर्व ताकद आमदार पाटील यांच्या पाठीमागे उभी करा. येणाऱ्या कालखंडामध्ये रस्ते,  सिंचन,शेतकऱ्यांची कामे करण्याची ठोस भूमिका आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली घेतली जाईल. असेही जि. प. सदस्य किरण पाटील यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमात जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष के. डी. पाटील, ज्ञानेश्वर मराठे, भोलेनाथ पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
  आमदार कुणाल पाटील यांनी नवलनगर ते मोहाडी प्र.डा. या रस्त्याचा अर्थसंकल्पात समावेश करून त्यास मंजुरी मिळवून घेतली होती. या रस्त्याच्या कामासाठी एकूण 465 लक्ष रुपये मंजूर करण्यात आले असून या निधीतून रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरणाचे काम होणार आहे.
  रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, धुळे पं.स. चे माजी सभापती बाजीराव पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, बाजार समितीचे प्रशासक रितेश पाटील, माजी पं.स. सदस्य पंढरीनाथ पाटील, कार्याध्यक्ष अशोक सुडके, जिल्हा उपाध्यक्ष के.डी. पाटील, माजी पं.स. सदस्य  भोलेनाथ पाटील,  सुरेश पाटील, काँग्रेस वाहतूक सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब पाटील, फागणे सरपंच कैलास पाटील, ज्ञानेश्वर मराठे, न्याहळोद उपसरपंच नाना माळी, जि.प. सदस्य अरुण पाटील, विलास गुजर, संचालक बापू खैरनार,स्विय सहाय्यक रामकृष्ण पाटील, चैतन शिंदे, युवक काँग्रेसचे संदीप पाटील, संजय पाटील वणी, राजू पाटील भिरडाई, भैय्या पाटील, अनिल पारखे अंबोडे, सातरणे सरपंच संदीप पाटील, प्रदीप पाटील माजी सरपंच, पूनमचंद पाटील, नवनीत पाटील, ज्ञानेश्वर पाटील, रवींद्र पाटील, संतोष पाटील, अरुण पाटील, परमेश्वर पाटील, मुकेश पाटील, अनिल पाटील, मोहाडी येथील राजू पाटील,आबा नांद्रे आदी उपस्थित होते.

WhatsApp
Follow by Email
error: