साथीच्या आजाराने दवाखाने झाले ‘फुल्ल’, शिरपूर शहरासह तालुक्यात कहर…

बातमी कट्टा: ऐन सणासुदीच्या तोंडावर शिरपूर तालुक्यात साथीच्या आजारांनी कहर केला आहे. थंडी, ताप, सर्दी,खोकलासह डेंग्यू, मलेरिया, चिकूनगुनिया सदृष्य आजारानेग्रस्त रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे शहरातील दवाखाण्यासह ग्रामीण भागातील दवाखाने फुल्ल झाले आहेत.
शिरपूर शहरासह तालुक्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे.शहरातील रुग्णालयात साथीच्या आजारानेग्रस्त रुग्णांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा तोडकी पडत आहे. शिरपूर शहरात डेंग्यू सदृश आजाराची साथ पसरली आहे. सप्टेंबर महिन्यात शिरपूर तालुक्यात डेंग्यू सदृष्य आजाराचे १५३ रुग्ण होते. यात शिरपूर शहरातील ९५ रुग्ण होते. यानंतर आरोग्य विभागाने गांभीर्याने उपाययोजना करणे अपेक्षित होते. कॉलनी, वसाहत, गल्ली, बोळात फॉगिंग करणे, डेंग्यूचा रुग्ण आढळून आलेल्या भागात घरांचे सर्वेक्षण करून ऍबेटिंग करणे, प्रतिबंधात्मक उपाय योजना करायला हव्या होत्या पण तसे झाले नाही. यामुळे साथीच्या आजारांचा संसर्ग अधिक वाढला आहे.

कोरोना महामारीने तालुक्यात सर्वत्र हाहाकार माजवला. नागरिकांना या आजाराचा सामना कररवा लागला. कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभागाने व प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या. या काळात शहरातील सी.टी.स्कँन सेंटर मधील गर्दी बघता तालुक्यातील हे चित्र केव्हा बदलेल यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरु होते.कोरोना काळात शिरपूर तालुक्यातील 104 रूग्णांना आपला जीव गमवावा लागला होता.मात्र जनतेने आणि आरोग्य विभाग व प्रशासनाने तालुक्यातील कोरोना पळवून लावला.यामुळे तालुक्यातील जनता आनंदी होती.मात्र काही दिवसांपासून तालुक्यात पुन्हा साथीच्या आजाराने थैमान घातले आहे.डेंग्यू सदृष्य लक्षणे असलेल्या आजारामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.या आजारांमुळे शहरातील रूग्णालयात उपचार घेण्यासाठी जागा शिल्लक नसल्याने धुळे येथे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे.

विशेष म्हणजे शिरपूर शहरात मोठया प्रमाणात साथीच्या आजारांसह डेंग्यू सदृष्य लक्षणे असलेल्या आजाराने डोके वर काढले आहे. शहरातील लहान मुलांमध्ये देखील याचा मोठ्या प्रमाणात त्रास उदभवत असल्याचे चित्र आहे.दोन वर्ष कोरोना काळात सर्वत्र सणासुदीला कुठलीही रोनक बघावयास मिळाली नव्हती. यावेळेस कोरोना हद्दपार झाल्याने या दिवाळीच्या सणात सर्वत्र पुर्वी प्रमाणे आनंदी वातावरण असणार असे वाटत असतांना मात्र साथीच्या आजारांसह डेंग्यू सदृष्य लक्षणे असलेल्या आजारामुळे काहींची दिवाळी गोड होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

आरोग्य विभागाकडून प्रत्येक गावो गावी फेर्या सुरु करण्यात आले असून सर्वे करत फवारणी करण्यात येत आहे. डेंग्युची उत्पत्ती होईल अशा ठिकाणे नष्ट करण्यात येत आहे. गटविकास अधिकारी यांच्या मार्फत ग्रामपंचायत विभागाला फवारणी बाबत सुचना करण्यात आल्या होत्या.काही रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्यांच्या बाबत कुठलीही माहिती प्राशसनाला मिळु शकत नसल्याने त्यांची नोंद करण्यात येत नाही.

आपला परिसर स्वच्छ ठेऊन डेंग्यू बाबतचे उपाययोजना कराव्यात,डेंग्यू उत्पत्ती असलेले स्थाने नष्ट करावे व लक्षणे जाणवल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे. डेंग्यूसह साथीचे आजार ताप,सर्दी,खोकला देखील मोठ्या प्रमाणात नागरीकांमध्ये दिसून येत आहे. आरोग्य यंत्रणा आपले कर्तव्य बजावत आहे मात्र आपण देखील आपले कर्तव्य योग्य पध्दतीने काळजीपूर्वक बजावणे गरजेचे आहे.

WhatsApp
Follow by Email
error: