बातमी कट्टा:- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर एस.टी महामंडळाच्या संयुक्त कृती समितीने संप पुकारत आमरण उपोषण सुरु केले आहे. आगारातील सर्व संघटना मिळुन दिलेल्या निवेदन विविध मांगण्यांसाठी उपोषण करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऐन सणासुधीच्या तोंडावर सर्व एस.टी कर्मचाऱ्यांनी संप पुकारत संयुक्त कृती समिती रा.प.च्या वतीने आगारात आमरण उपोषण सुरु केले आहे. शासनाने मागण्या मान्य कराव्यात यासाठी उपोषण करण्यात येत आहे.निवेदनात दिलेल्या मुद्यांची सोडवणूक दिवाळी सणापूर्वी हावी या करण्यासाठी कृती समिती तर्फे पासून आमरण उपोषण करण्यात येत आहे.
खालील मागण्या पूर्ण व्हाव्या यासाठी आमरण उपोषण करण्यात येत आहे.
१) रा. प. महामंडळाने राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे.
(२) रा. प. महामंडळातील कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी घोषित करण्यात यावे,
३ ) रा. प. कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचायाप्रमाणे भने व इतर साधीसुविधा देण्यात याव्या. ४) वार्षिक वेतनवाढ ३% व घरात ८,१६, २४ टक्के लागू करण्याचे मान्य केला असतानाही अद्याप दिलेला नाही.
५) रा.प. कर्मचा-यांना चेतन वेळेवर मिळत नाही.
६) लॉकडोउन काळातील कविता तात्काळ देण्यात यावा, ७) अनियमित वेतन वेळेत मिळण्यात यावे व दिवाळी बोनस १९५००० १२५०० अग्रीम उचल देण्यात यावी.
अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र अचानक पुकारलेल्या संपामुळे बसस्थानकात आलेल्या अनेक प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.