बातमी कट्टा:- जनतेने माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडून दिले होते त्यांचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे आणि यामुळेच पदावर असतांना 15 वित्त आयोगातून मंजूर झालेले विकासात्मक कामाचे भुमी पुजन केल्याचे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी केले.
शिरपूर तालुक्यातील जातोडे गणाचे माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील यांनी पदावर कार्यरत असतांना 15 वित्त आयोगातून फ्लेवर ब्लॉक आणि भुयारी गटारी असा 5 लाखांचा निधी जातोडे गावासाठी मंजूर केला होता.मात्र त्या नतंर पुन्हा झालेल्या जि.प.व पंचायत समिती पोट निवडणूकीत ते काम रखडले होते.पुन्हा निवडणूकी संपल्यानंतर मंजूर करुन आणलेल्या विकास कामाचे आज दि 1 रोजी जातोडे येथे भुमी पुजन करण्यात आले.
याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य निलेश पाटील बोलतांना म्हणाले की,जातोडे गावाने माझ्यावर विश्वास ठेऊन मला निवडणूकीत निवडून दिले होते.येथील जनतेच्या समस्या सोडवून त्यांचे ऋण फेडणे हे माझे कर्तव्य आहे. माजी मंत्री आमदार अमरीशभाई पटेल,जि.प अध्यक्ष तुषार रंधे व उपशगराध्यक्ष भुपेशभाई पटेल आणि आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली 15 वित्त आयोगातून 5 लाखांचा निधी मंजूर केला होता.मात्र तांत्रीक अडचणींमुळे तो रखडला होता.मात्र त्या निधीचा जातोडे येथील जनतेला फायदा मिळावा यासाठी आज या अंडरग्राऊंड गटार व फेव्हर ब्लॉक कामाचे भुमी पुजन केले असल्याचे प्रतिपादन माजी पं स सदस्य निलेश पाटील यांनी यावेळी केले आहे.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य भरत पाटील,पंचायत समिती सदस्य निंबा पाटील,माजी उपसभापती जगतसिंग राजपूत,माजी जि.प सदस्य जितेंद्र कुवर,जातोडे सरपंच रत्नाबाई रावसाहेब धनगर,उपसरपंच प्रतिभाबाई दर्यावसिंग राजपूत,ग्रा.प सदस्य रवींद्र राजपूत,ग्रा.प.सदस्य मोहन राजपूत,ग्रा.प.सदस्य देवेन राजपूत,ग्रा.प.सदस्य जयसिंग सिसोदिया,ग्रा.प.सदस्य शिवदास भिल,सदस्य भोजु अहिरे,सदस्य रोहिदास भिल,चेअरमन बखतसिंग तिरसिंग, उपचेअरमन सुभाष निळे, तंटामुक्त अध्यक्ष रविंद्र राजपूत, वि.का.स सदस्य लोटनसिंग राजपूत,बोरगाव उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, माजी चेअरमन वजेसिंग राजपूत,माजी सरपंच भटेसिंग राजपूत, माजी वि.सो.सा चेअरमन सुभाष राजपूत,माजी उपसरपंच उदेसिंग राजपूत, माजी उपसरपंच जगतसिंग तिरसिंग राजपूत, माजी उपसरपंच जयसिंग राजपूत,माजी सरपंच लोटन धनगर,डॉ गजेंद्र राजपूत दिलीप धनगर,ग्रा.प शिपाई नाना धनगर आदी जण उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नारायण राजपूत यांनी केले.