पाणीच्या टाकीवर चढून “गळफास” चा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल….

बातमी कट्टा:- पाणीच्या टाकीवर चढून तरुणाने दोरीच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना काल दि 31 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास घडली.तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तरुणाला उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

On youtube

काल दि 31 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील देवघर येथील अनिल अशोक साळुंखे हा तरुण शिरपूर तालुक्यातील पाणीच्या टाकीच्यावर चढला होता सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने टाकीला दोरी बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेत नागरिकांनी धाव घेतली होती तर पोलीस देखील दाखल झाले होते.नागरिकांनी त्या तरुणाला पाणी टाकीच्या खाली आणून त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

मालेगाव तालुक्यातील देवघर येथील तरुण दहिवद येथील पाणीच्या टाकीच्या वर चढून आत्महत्याचा प्रयत्न का करत होता ? याबाबत तर्क वितरक लावण्यात येत आहेत.घटनेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

व्हिडीओ वृत्तांत
https://youtu.be/KTILPcaDbgQ
WhatsApp
Follow by Email
error: