लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तीन एकर ऊस जळून खाक….

बातमी कट्टा:- सर्वत्र दीपावली पर्व सुरू असताना आणि आनंद साजरा केला जात असतांना कापणीला आलेला 3 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर येथे गुरुवारी दुपारी घडली असून महसूल च्य कर्मचाऱ्यांनी सायंकाळी सदर शेतात जाऊन पंचनामा केला आहे.

on youtube


जुने भामपूर येथील शेतकरी अशोक निंबा पाटील यांचे जुने भामपूर शिवारात उखळवाडी गावालगत 10 एकर क्षेत्र असून त्यांनी 4 एकरात ऊस व 6 एकरात कापूस लागवड केली होती. दरम्यान ऊस तोडणीला आला होता. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुरुवारी उखलवाडी येथील मजूर कापूस वेचणी करीत असताना दुपारी दीड 2 च्या सुमारास ऊस लागवड केलेल्या क्षेत्रातुन धूर दिसून आल्याने शेत मालकासह मजुरांनी धाव घेतली असता आग दिसून आल्याने मजुरांनी काही अंतरावर ऊस तोडला तर काहींनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत तोडणीला आलेला 4 एकरांपैकी जवळपास 3 एकर क्षेत्र जळून खाक झाले.यामुळे सदर शेतकरी हताश झाला. याविषयी अशोक पाटील यांनी तहसीलदार आबा महाजन यांनी फोन वरून माहिती दिली.तहसीलदार आबा महाजन यांनी तात्काळ तलाठी यांना घटनास्थळी भेट देत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.दिवाळी निमित्ताने सुट्टी असून ही तलाठी सोनवणे यांनी धाव घेत पंचनामा करीत शेतकऱ्याचे सांत्वन करीत करून दिलासा दिला.मात्र शेतकऱ्याचे ऐन दुष्काळी परिस्थिती आणि दिवाळीच्या पर्वात इतरांचे देने असतांना नुकसान झाल्याने या हवालदिल दिसून आला व शासनाकडून मदतीची अपेक्षा करीत आहे

On youtube
WhatsApp
Follow by Email
error: