बातमी कट्टा:- पुण्यतिथी आणि जयंतीच्या कार्यक्रमांना सामाजिक उपक्रम राबवून आईवडीलांच्या आयुष्याचे सार्थक होत असते. आईवडीलांनी दिलेल्या संस्कारातून आयुष्याची वाटचाल करीत समाजिक जीवनात वाटचाल करायची असते. ह्याच संस्काराचे सोने करीत आज स्व.केशरताई काशिनाथ पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने रक्तदानासारखा मोलाचा उपक्रम घेतला जातो ही खरोखरच कौतुकास्पद बाब आहे. असे गौरवोद्दगार आ.कुणाल पाटील यांनी काढले. धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील यांनी आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी स्व.केशरताई पाटील यांच्या नातसुनांनी रक्तदान करुन महिलांसाठी आदर्श उभा केला तर एकाच कुटूंबातील तब्बल 23 जणांनी रक्तदान करुन इतिहास घडविला.
रुढी परंपरेला विधायकतेचे स्वरुप देत धुळे तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील यांनी आईच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. तरवाडे ता.धुळे येथे दि.9 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वा. रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी एकूण 103 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ.कुणाल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.आपल्या उद्घाटनपर भाषणात बोलतांना आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, आजच्या घडीला एकत्र कुटूंबपध्दती लयास गेली आहे मात्र स्व.केशरताई यांनी तरवाडे या गावात एकत्र कुटूंब ठेवून नवा आदर्श घडवला होता. एकत्र कुटूंबामुळे त्या कुटूंबाची प्रगती होवून समाज पुढे जात असतो. त्यामुळे आजच्या पिढीने स्व.केशरताई यांच्या संस्काराचा आदर्श घेणे गरजेचे असल्याचे आ.कुणाल पाटील यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी आ.प्रा.शरद पाटील, संजय शर्मा आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एकाच कुटूंबातून 23 जणांचे रक्तदान-
ग्रामीण भागासह शहरात आजही रक्तदानाबद्दल समज गैरसमज आहे. रक्तदान करण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही मात्र रक्तातच सामाजिक बांधिलकी असल्याने तरवाडे येथे स्व.केशरताई काशिनाथ पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीनिमित्ताने त्यांच्याच कुटूंबातील तब्बल 23 जणांनी रक्तदान करुन एक इतिहास निर्माण केला. यावेळी सौ.अनिता पाटील, सौ.शिल्पा पाटील, सौ.सुरेखा पाटील,सौ.सरोज पाटील, सौ.भाग्यश्री पाटील या सुना व नातसुनांनीही रक्तदान करुन महिलांपुढे आदर्श उभा केला आहे. त्यामुळे या कुटूंबाचे जिल्हयात कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमाला आ.कुणाल पाटील यांच्यासोबत बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर,काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.शरद पाटील, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, माजी सभापती बाजीराव पाटील,संजय शर्मा, जिल्हा बँकेचे नवनियुक्त संचालक भगवान पाटील, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, व्हा.चेअरमन दिनकर पाटील, माजी पं.स.सदस्य अविनाश महाजन,जि.प.सदस्य अरुण पाटील, संचालक संतोष राजपूत, सुरेश पाटील,किर्तीमंत कौठळकर,काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक सुडके,भाऊसाहेब पाटील,गोकुळसिंग राजपूत,वाहतूक सेलचे अध्यक्ष रावसाहेब पाटील, दुध संघाचे चेअरमन वसंत पाटील,आरोग्य सेवक गोकुळ राजपूत,विलास पाटील, पांडूरंग मोरे,नवनीत मोरे, यांच्यासह तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा शासकिय रुग्णालयातील रक्तपेढी रक्त संकलन केले.आभार कार्यक्रमाचे आयोजक खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील यांनी मानले.