दोघेही मोटरसायकलीने जात असतांना सायंकाळी 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील चोपडा फाट्यावर मोटारसायकल घसरल्याने अपघात झाला असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
शिरपूर तालुक्यातील नागेश्वर बंगला येथील किरण मच्छीन्द्र नगराळे व शांताराम सोमा ठेलारी हे गुरुवारी शिरपूर शहरात आले होते. ते सायंकाळी 7 :730 वाजेच्या सुमारास नागेश्वर बंगला येथे गावी परत जात असताना महामार्गाजवळ चोपडा फाट्यावर ताब्यातील मोटारसायकल घसरल्याने अपघात झाला.अपघात एवढा भीषण होता की,अपघातात किरण मच्छीन्द्र नगराळे यांचा जागीच मृत्यू झाला असून शांताराम सोमा ठेलारी हे गंभीर जखमी झाले आहेत.
मयत व जखमीस महामार्ग अम्ब्युलन्सने शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.डॉ.हिरेन पवार यांनी किरण मच्छीन्द्र नगराळे यास तपासणी करून मयत घोषित केले तर शांताराम सोमा ठेलारी यांच्यावर उपचार सुरु आहेत.