बातमी कट्टा:- सरकारी नोकरीत असलेले दाम्पत्यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकारी आणि शिक्षण विभागात वरिष्ठ साहाय्यक या दोन्ही दाम्पत्यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.
धुळे लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतलेल्या लाचखोर दाम्पत्याची जिल्हाभर चर्चा सुरु आहे.जिल्ह्यातील ग्राम विकास अधिकारी जयश्री पाटील आणि शिक्षण विभागात वरिष्ठ सहाय्यक असलेले संदीप पाटील हे दोन्ही दांपत्यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले आहे.धुळे तालुक्यातील शिरडाणे येथील एका तक्रारदाराच्या मालमत्तेचा आठ अ उतारा मिळवण्यासाठी ग्राम विकास अधिकारी जयश्री पाटील यांनी 35 हजार रुपयांची मागणी केली व ती रक्कम घरी आणून देण्यासाठी सांगितली याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
व धुळे लाचलुचपत विभागाने चौकशी केल्यानंतर सापळा रचत तक्रारदाराला 35 हजार रुपयांची रक्कम घेऊन, जयश्री पाटील यांच्याकडे पाठवले जयश्री पाटील यांनी लाचेची रक्कम आपल्या पती संदीप यांना द्यायला सांगितले वरीष्ठ साहाय्यक अधिकारी संदीप पाटील यांनी ती रक्कम स्वीकारली आणि ती मोजायला ही सुरुवात केली यादरम्यान धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ दोघांना ताब्यात घेतले.दोघांवर पश्चिम देवपूर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघेही सरकारी नोकरीत असतांना व लाख रुपयांची पगारातून आवक असतांना लाचेची भूक असलेल्या या पती – पत्नी दोघांची आता जिल्ह्यात सर्वत्र चर्चा सुरु आहे.