धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भाजप तर्फे माजी मंत्री अमरिश पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

बातमी कट्टा:- धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षा तर्फे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.

त्यापूर्वी श्री विले पार्ले केळवणी मंडळ कॅम्पस (गुरुद्वारा मागे) येथे अनेक मान्यवर तसेच धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

माजी मंत्री गिरीष महाजन म्हणाले की, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अमरिश पटेल यांचे एकमेव नाव पक्षाकडे आले, त्यांचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे. दिल्ली येथून देखील पक्षाने अमरिश पटेल यांचे प्राधान्याने नाव पुढे केले.आपला विजय 100 टक्के नक्की आहे, सर्वांनी मताधिक्यासाठी प्रयत्न करावे. सर्व मतदार यांना सोबत घेऊन आपण काम करावे,भाजपाची ताकद सर्वत्र वाढतेय व वाढवायचीय. अमरिश पटेल यांच्या कामाची पध्दत उत्कृष्ट आहे. ते सर्व पक्षाला घेऊन चालतात, भाई कोहिनूर हिरा आहेत.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, भाजपा कार्यकर्ते परिश्रमातून पुढे आले आहेत, अनेक ठिकाणी भाजपाची सत्ता आहे. विधान परिषदेत अमरिश पटेल यांच्या सारखे तज्ज्ञ व्यक्ती यांची गरज आहे. शिक्षण, राजकीय व सर्वच क्षेत्रात त्यांनी अतुलनीय कामगिरी बजावली आहे. महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक निवडणूक होईल. जनतेत जावून काम करणारे नेते म्हणून अमरिश पटेल हे लोकप्रिय आहेत.

यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री आमदार गिरीष महाजन, माजी मंत्री आमदार जयकुमार रावल, भाजपा संघटन मंत्री रविंद्र अनासपुरे, माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, खा. डॉ. सुभाष भामरे, खा. डॉ. हिना गावित, उमेदवार माजी मंत्री अमरिश पटेल यांच्यासह आमदार काशिराम पावरा, आमदार राजेश पाडवी, धुळे जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, महापौर प्रदीप कर्पे, उपमहापौर भगवान गवळी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, मकरंद पाटील, अजय परदेशी,

शिवाजीराव दहिते, कुसुमताई निकम, धरती देवरे, भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, नंदुरबार जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, कामराज निकम, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, सुभाष देवरे, मनोहर भदाणे, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, चिंतनभाई पटेल, डॉ. सुप्रिया गावित, सुरेश पाटील, बापू खलाणे, नबू पिंजारी, जितेंद्र सूर्यवंशी, संग्राम पाटील, संजय जाधव, दीपक भोसले, सुनिल बैसाणे, देवेंद्र पाटील, किशोर माळी वाघाडी, हेमंत पाटील, प्रतिभा चौधरी, प्रा. अरविंद जाधव, हिरामण गवळी, नरेंद्रसिंह सिसोदिया, राहुल रंधे, बंटी मासुळे, भिकन वारुडे, राजेंद्र देसले, राजगोपाल भंडारी, प्रभाकरराव चव्हाण, राहुल दंदे,शीतल नवले, भाऊसाहेब देसले, विजय पाटील, सत्तरसिंग पावरा, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी तर सूत्रसंचालन प्रभाकरराव चव्हाण यांनी केले. आभार प्रभाकरराव चव्हाण यांनी मानले.

WhatsApp
Follow by Email
error: