बातमी कट्टा:- वनजमीन क्षेत्रात एक शेतात ट्रक्टरद्वारे काम करीत असतांना ट्रॅक्टर पलटी झाल्याने ट्रक्टर चालक खाली दाबला गेलताने जागीच मयत झाल्याची घटना तालुक्यातील चाकडू शिवारात सोमवारी दुपारी घडली असून शहर पोलीस ठाण्यात वाहन अपघाताची नोंद करण्यात अळू आहे.
याप्रकरणी चाकडू येथील सरपंच सुरेश आखाडे याने तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारि नुसार सुनील आखाडे यांच्या मालकीच्या निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीच्या ट्रक्टर वर गावातील जगन हाजमा पावरा वय 35 हा चालक म्हणून कामाला असतांना सोमवारी तो शिवारातील गहाण केलेल्या वन जमीन क्षेत्रात कापूस पिकात मशागत करतांना जमीनी च्या परिस्थिती कडे लक्ष न देता भरधाव आणि निष्कळजी पणाने ट्रक्टर चालवताना पलटी केला आणि त्यात जगणं पावरा हा खाली दाबला गेल्याने जागीच मयत झाला.त्यास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले.
दाखल तक्रारीवरून चालक जगन पावरा याने निष्काळजीपणा व बेजबाबदार भरधाव वेगाने वनजमीनी क्षेत्रावरील टेकडीवर ट्रॅक्टर चालवून स्वताच्या मृत्यूस व ट्रॅक्टरच्या नुकसाणीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी मयत जगन हाजमा पावरा याच्या विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोना फुलपगारे करीत आहेत