बातमी कट्टा:- गावाला जाण्यासाठी निघालेल्या कुटुंबातील महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगलपोत ओढून चोरट्याने पळ काढला. मंगलपोत ओढत असतांना चोर दिसल्याने उपस्थितांनी त्याचा पाठलाग केला मात्र तो अंधाराचा फायदा घेत फरार झाला आहे.
याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात राकेश रामेश्वर गोसावी वय-३२ वर्षे व्यवसाय- मजुरी रा, वाघाडी ता.शिरपुर यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की,त्यांचा मोठा भाऊ अमोल रामेश्वर गोसावी हा त्याची पत्नी पुनम अमोल गोसावी व दोन मुलांसह टिटवाळा ता कल्याण जि ठाणे येथे राहतात.दि 20 रोजी भाऊ वहिणी हे मुलांसह वाघाडी येथे दिवाळी सणासाठी आले होते.
काल दिनांक 24 रोजी सायंकाळी 7 वाजेचे सुमारास भाऊ अमोल हा वहिणी व मुलांसह टिटवाळा येथे जाण्यासाठी वाघाडी येथुन शिरपुर येथे येण्यास निघाला त्यांना सोडण्यासाठी रिक्षाने शिरपुर येथील चोपडा जिन येथे आम्ही ट्रॅव्हल्स पॉइंटवर आलो तेथे सायंकाळी ०७.३० वाजेचे सुमारास स्वामी ट्रॅव्हल्स आल्याने आम्ही सामान ट्रॅव्हल्सचे डिक्की मध्ये ठेवत असतांना एक अनोळखी इसम आला व त्याने वहिणी पुनम हिच्या गळयात असलेली सोन्याचे मणीमंगळसुत्रची पोत जोराने ओडुन पळ काढला लागला यावेळी त्याचा पाठलाग केला परंतु तो अंधाराचे दिशेने पळाल्याने तो मिळुन आला नाही.सदर चोरटा अनोळखी इसम हा अंदाजे २० ते २५ वयोगटातील असून अंगाने सडपातळ अंदाजे ५ फुट उंचीचा त्याने अंगात काळया रंगाचा शर्ट व पांढ-या रंगाची काळया लाईनींगची फुल पॅन्ट घातलेल्या असल्याचे फिर्यादीत वर्णन सांगितले आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.