बातमी कट्टा धुळे व नंदुरबार जिल्हातील विधान परिषदेच्या निवडणूकीत अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे.त्यांच्या विरूध्द असलेले उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने अमरीश पटेल बिनविरोध निवडून आले आहेत.
धुळे व नंदुरबार जिल्हा विधान परिषद निवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षातर्फे माजी शालेय शिक्षण,क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिश पटेल यांनी मंगळवारी 23 नोव्हेंबर रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.तर काँग्रेस पक्षातर्फे नगरसेवक गौरव वाणी ,शामकांत सनेर यांनी देखील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल केला होता.आज दि 26 रोजी माघारी दिनी कोण माघाय घेईल याकडे सर्वांचे लक्ष होते.इतर सर्व उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने अमरिश पटेल हे बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे कार्यकर्त्यांनी शिरपूरात जल्लोष साजरा केला.