बैलांना घेऊन जाणाऱ्या मालवाहतूक वाहनाचा सावळदे नदी पुलावर अज्ञात अवजाड वाहनाने धडक दिल्याने अपघात घडला आहे.वाहनाला धडक दिल्याने वाहन तापी पुलाच्या लोखंडी कठड्यावर जाऊन धडकला यात मालवाहू वाहनाचा पुढील भागाचा पुर्णता चकाचूर झाला असून पुलावरील लोखंडी कठड्यांवर जाऊन धडकल्याची घटना घडली आहे सुदैवाने यात कुठलीही जिवतहानी झालेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 29 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील सावळदे तापी नदी पुलावर अपघाताची घटना घडली आहे.आज दि 29 रोजी शिरपूर येथे आठवडा बाजाराचा दिवस असल्याने पारोळा येथून व्यापारी रमेश श्रीपद चौधरी हे मालवाहक वाहनात बैले घेण्यासाठी शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील बैल बाजारत आले होते.
आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास रमेश चौधरी यांनी सात बैले विकत घेऊन ते बैले एम.एच 39 सी.7948 क्रमांकाच्या मालवाहक वाहनाने पारोळा येथे घेऊन जात असतांना सावळदे तापी नदी पुलावर अज्ञात भरधाव वाहनाने मागच्या बाजूने धडक दिल्याने रमेश चौधरी यांचे मालवाहतूक वाहन तापी पुलावरील लोखंडी कठड्याला जाऊन धडकला यात वाहनाचा पुढील भागाचा पुर्णपणे चकाचूर झाला.वाहनाचे पुढील दोन चाक निखळले. तर बैलांनी वाहनाच्या बाहेर उड्या घेऊन पळ काढला यात सात बैल पैकी चार बैले मिळुन आले आहेत. तर तिन बैल घाबरून शेताच्या दिशेने पळाले असुन मिळुन आलेले नाहीत. सुदैवाने यात व्यापारी रमेश चौधरी यांना कुठलीही दुखापत झालेली नाही. घटनास्थळी शिरपूर टोलनाका येथील रुग्णावहीकासह कर्मचारी मदतकार्यसाठी दाखल झाले होते.
हा अपघात ईतका भिषण होता की जोराने वाहन पुलाच्या मध्यभागी लोखंडी कठड्यावर जाऊन धडकले.लोखंडी कठड्यांमुळे वाहन पुलावरच थांबले अन्यथा वाहन पुलाच्या खाली पडून मोठी दुर्खटना घडली असती.