बातमी कट्टा:- पोलीसांनी शेतातील झोपडीवर छापा टाकून झोपडीत लपवून ठेवलेल्या गोणीतील सुमारे 93 हजार 600 रुपये किंमतीचा सुका गांजा पोलिसांनी कारवाई केली आहे. याबाबत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि 1 रोजी शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहीतीच्या आधारे शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान येथील रामा रूमाल्या पावरा याने चिलारे, टिटावापाणी गावाचे शिवारात धरणाजवळ असलेल्या शेतातील झोपडीत सुका गांजा अमली पदार्थाचा साठा केल्याचे लक्षात आले होते. त्यानुसार पोलीस पथक घटनास्थळी रवाना होत झोपडीवर छापा टाकला असता यात झोपडीतील असलेल्या गोणीत 93 हजार 600 रूपये किमतीच्या 9.360 किलो ग्रँम वजनाचा गांजा अंमली पदार्थ मिळुन आला आहे.
सदरची कारवाई सपोनि सुरेश शिरसाठ,प्रादेशिक परिवहन अधिकारी धर्मराज पाटील, पोसई खैरनार,लक्ष्मण गवळी,गंगाराम सोनवणे,संजय देवरे,सईद शेख,संदीप शिंदे,रोहिदास पावरा,योगेश मोरे व चालक इसरार फारूकी व शिरपूर वनविभागाचे मनोज पाटील, संजय इंडे यांनी केली असून पोकॉ रोहिदास पावरा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.