बातमी कट्टा:- घराचा 8-अ उतारा देण्याच्या मोबदल्यात 2 हजार रूपयांची लाच स्विकारतांना ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली असून ग्रामसेवक विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी दि 2 रोजी शहादा तालुक्यातील पुसनद शिवारात तक्रारदाराने नवीन घर खरेदी केले आहे. तक्रारदाराच्या वडिलांनी त्या घराचा 8-अ चा उतार्याची ग्रामपंचायतीतून मागणी केली होती. त्यावेळेस ग्रामसेवक उमेश रौंदळे याने उताराच्या मोबदल्यात दोन हजाराची मागणी केली.याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला माहिती दिली.त्यानुसार लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून ग्रामसेवक उमेश रौंदळे यास शहादा येथील खरेदी – विक्री संघाच्या आवारात दोन हजारांची लाच स्विकारत असतांना लाचलुचपत पथकाने ग्रामसेवक उमेश रौंदळे यास रंगेहाथ ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.