विक्रीसाठी आणलेले 15 ते 16 कुलर जळून खाक…!

बातमी कट्टा:- अचानक घराला लागलेल्या आगीत विक्रीसाठी आणलेल्या 15 ते 16 कुलर जळून खाक झाल्याची घटना घडली असून यात घरगुती साहित्य देखील आगीत जळाले आहेत. या आगीत अंदाजे दोन ते सव्वा दोन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले आहे.

आज दि 10 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास सदर घटना घडली आहे. शिरपूर शहरातील रामसिंग नगर भागात राहणारे भरतसिंग शांताराम गिरासे यांचे बसस्थानक समोर भोलेनाथ इलेक्ट्रीक नावाची दुकान आहे. तेथील विक्रीसाठी आणलेले 15 ते 16 तीन फुटी कुलर त्यांनी रामसिंग नगर येथील आपल्या खालील घरात ठेवले होते.तर वरच्या मजल्यावर भरतसिंग गिरासे यांचे कुटुंब वास्त्व्यास आहे.

आज दुपारी भरतसिंग गिरासे त्यांच्या नातवंडांना शाळेत पोहचविण्यासाठी घराच्या खाली उतरले तेव्हा घरातून काळा धुर येत असल्याचे त्यांच्या आले. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर उपस्थितांनी बघितले तेव्हा घरात ठेवलेले 15 ते 16 नव्या कुलरांना आग लागली होती.उपस्थितीतांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदतकार्य सुरु केले तर अग्निशमन दलाचा एक बंब बोलवून आग आटोक्यात आणण्यात आली.मात्र त्यावेळेत 15 ते 16 कुलर व घरगुती साहित्य जळून खाक झाले.या आगीत भरतसिंग गिरासे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे दोन ते सव्वादोन लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले आहे.

WhatsApp
Follow by Email
error: