पत्नी आणि मुलीला मोटारसायकलीने घेऊन जात असतांना अपघात

बातमी कट्टा:- पती- पत्नीसह चार वर्षीय मुलगी मोटरसायकलीने सांगवीकडे जात असतांना मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड चेकपोस्ट जवळ रस्त्यावर ठेवण्यात आलेल्या दगडी बॅरिकेटस मोटरसायकलीने धडक दिल्याची घटना घडली यात पती व पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 11 रोजी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महमार्गावरील हाडाखेड सिमा तपासणी नाकावर दगडी बॅरिकेटस मोटरसायकलने धडक दिल्याची घटना घडली आहे.शिरपूर तालुक्यातील जूने सांगवी येथील महेश दिपल्या पावरा वय 30 हा एम.एच 18 बिक्यु 9956 क्रमांकाच्या मोटारसायकलीने त्याची पत्नी रमाबाई महेश पावरा 23 व मुलगी राधिका महेश पावरा य 4 वर्ष यांना घेऊन शिरपूरकडून सांगवी गावाकडे जात असतांना हाडाखेड सिमातपासणी नाकावरील उभे केलेले दगडी बॅरिकेटसला मोटारसायकल जाऊन धडकली.या अपघातात महेश पावरा व पत्नी रमाबाई पावरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपस्थितीतांनी तात्काळ मदतकार्य करत रुग्णवाहिकेने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.मुलगी राधिका हिला कुठल्याही प्रकारे दुखापत झाले नसून दोन्ही पती – पत्नी गंभीर जखमी असल्याने धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: