बातमी कट्टा:- घराचा कुलदिपक म्हणून लाडाने वाढवलेल्या एकुलता एक तरुणाचे पंधरा दिवसांपुर्वी लग्न झाले होते. आनंदी वातावरणात संसाराला सुरवात झालीच होती.सुखी संसाराचे स्वप्न रंगवत असतांनाच मात्र काळाने घाला घातला. रस्त्यावर उभा असतांनाच अचानक ब्रेकफेल झालेल्या भरधाव कंटनेरने त्याला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावातील चेतन रमेश सोलंकी वय अंदाजे 26 हा तरुण पुणे येथील कंपनीत मेकनील इंजिनिअर म्हणून कार्यरत होता.तो घरातील एकुलता एक मुलगा होता.त्याचे नुकतेच दि 9 डिसेंबर 2021 रोजी धुळे येथे धुमधडाक्यात विवाह संपन्न झाला होता.सुखी संसार आता सुरुच झाला होता.पाच दिवासांपुर्वी तो त्याच्या पत्नीसह पुण्यात आला होता.नेहमी प्रमाणे कंपनीत जाण्यासाठी चेतन सोळंखी पुणे येथील मुंबई -बंग्लोर महामार्गावरील नवले पुलावजळ गाडीची वाट बघत उभा होता.मात्र कंटनेरचा ब्रेकफेल झाल्याने अचानक कंटेनर भरधाव वेगाने मागे येऊन वाहनांसह उभ्या असलेल्या व्यक्तींना जाऊन धडकला यात तिन जणांचा मृत्यू झाला.या भिषण अपघातात चेतन साळुंखे जागीच गतप्राण झाला.
घटनेची माहिती गावासह परिसरात समजता गावात हळहळ व्यक्त होत आहे.मयत चेतन साळुंके याच्यावर शिरपूर तालुक्यातील पळासनेर येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी व दोन बहिण होत.