बातमी कट्टा:-एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.जेमतेम पिक उभे करुन त्यातून येणाऱ्या उत्पन्नातून शेतकरी उदरनिर्वाह करत आहे.दैवा पाठोपाठ चोरांनीही शेतकऱ्याला लुटल्याची घटना घटली आहे. शेतातील कापूस विक्री करून आलेले पैसे बँकेत जमा करण्यासाठी गेलेल्या 77 वर्षीय शेतकऱ्यांच्या पिशवीतून 1 लाखाची रोकड लंपास केल्याची घटना स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत घडली आहे.
शिरपूर तालुक्यातील जैतपूर येथील कमलसिंग नागो राजपूत यांनी कापूस विक्रीतुन आलेले होती 1 लाख 25 हजार रुपये शिरपूर शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खात्यावर जमा करण्यासाठी 3 जानेवारी रोजी सोमवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास गेले होते.स्टेट बँक ऑफ इंडिया येथे अकाऊंट मध्ये जमा करण्यासाठी आले होते.त्यात 25 हजार खिशात ठेवले होते तर एक लाखांची रोकड पिशवीत ठेवली होती. रक्कम जास्त असल्याने व पॅन कार्ड सोबत नसल्याने बँकेच्या कॅशियरने 49 हजाराची स्लिप भरण्याचे सांगितले.कमलसिंग नागो राजपूत यांनी रोकड ताब्यात घेऊन 49 हजाराची स्लिप भरत असतांना रोकडची पिशवी बाजूला ठेवली.स्लिप लिहून पैसे जमा करण्यासाठी उभे राहिले तेव्हा त्यांच्या पिशवीत शंभरच्या नोटा असलेली एक लाखांची रोकड मिळुन आली नाही त्यांनी आजूबाजू तपासणी केली.मात्र पैसे चोरी झाल्याचे त्यांना लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ शहर पोलीस स्टेशन गाठून चोरीची माहिती दिली.त्यानंतर घटनास्थळी पोलीस कर्मचारी यांनी पाहणी करीत पोलीसांकडुन सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात आली त्यानंतर 6 जानेवारी रोजी मंगल सिंह राजपूत यांनी 3 जानेवारी 2020 रोजी स्टेट बँक कोणीतरी अज्ञात संशयिताने एक लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे.