बातमी कट्टा:- गांजाची वाहतूक करत असतांना पोलीसांनी शिताफीने दोन संशयितांना 1 लाख 27 हजार 450 किंमतीचा 24 किलो 690 ग्रँम वजनाचा गांजा जप्त केला आहे.दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर एक संशयित फरार आहे.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षह रविंद्र देशमुख यांना गोपणीय माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे दि 13 रोजी रात्री 8:30 वाजेच्या सुमारास मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाटा येथे पोलीसांनी सापळा रचला असता तेथे दोन तरुणांवर संशय आल्याने पोलिसांनी दोघांना विचारपूस केली.त्यांच्या कडे तपासणी केली असता 24 किलो 690 ग्रँम वजनाचा 1 लाख 27 हजार 450 किंमतीचा गांजा मिळुन आला.पोलीसांनी किसन विजय मारीमुतू वय 22 उल्हासनगर ठाणे व गौरव उर्फ गोलू दिनेश कजानिया वय 19 या दोन्ही संशयितांना गांजासह ताब्यात घेतले.सदर गांजा हा शिरपूर तालुक्यातील बोराडी परिसरातील आपसिंग पाडा येथील मिथुन पावरा याच्या कडून आणल्याची कबूली दोन्ही संशयितांनी दिली.हा गांजा ते उल्हासनगर जि.ठाणे येथे घेवून जात असल्याचे संशयितांनी सांगितले.तिन्ही संशयितांविरुध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.