विजेच्या पोलवर काम करतांना तरुण शेतकऱ्याचा मृत्यू, नातेवाईकांचा आक्रोश, वायरमन ओपरेटरच्या निष्काळजीपणा मुळे तरुण शेतकऱ्याचा जागिच मृत्यू,

बातमी कट्टा,समाधान ठाकरे:- महावितरण विभागाच्या वायरमनने शेतकऱ्याला विजेच्या पोलवर फेज जोडण्यासाठी चढवले असतांना ओपरेटरने अचानक विज प्रवाह सुरु केल्याने तरुण शेतकऱ्याचा शॉक लागून जागिच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.घटनास्थळावरून फरार झालेल्या कर्मचाऱ्याला पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेबाबत पोलीस अधिक्षक पी.आर पाटील यांनी दुख व्यक्त केली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दि 14 रोजी दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास नंदुरबार तालुक्यातील अमळथे शिवारात ट्रान्सफॉर्मरचे काम सुरू होते.यावेळी अमळथे येथील तरुण शेतकरी पंकज दरबारसिंग गिरासे या 30 वर्षीय शेतकऱ्याला महावितरण कर्मचारी शरद रमेश जाधव याने पोलवरील फेज काढण्यासाठी इलेक्ट्रीक पोलवर चढवले
शेतकरी पंकज गिरासे यांना कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रिक कामाचे कौशल्य नाही हे माहीत असताना तसेच त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षिततेबाबतचे साधने न देता सदर कौशल्य नसलेला व्यक्ती हा सदरचे काम करीत असताना मृत्यू घडून येण्याचा संभव आहे याची जाणीव असताना देखील त्या शेतकऱ्याला इलेक्ट्रिक पोलवर फेज जोडण्यासाठी चढविले व ऑपरेटर ललित चंदने याने खात्री न करता विद्युत पुरवठा सुरू केला यामुळे शेतकरी पंकज गिरासे यांचा जागिच मृत्यू झाला.

घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली.वायरमन व ओपरेटरच्या निष्काळजीपणामुळे पंकजसिंग गिरासे या तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचे नागरीकांनी सांगितले.या घटनेमुळे नागरिकांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला.घटना घडल्यानंतर संबधीत वायरमन
घटनास्थळावरून फरार झाला होता.दुपारी 3:30 वाजता घटना घडली असतांना रात्री 8:30 वाजेपर्यंत महावितरणचे कुठलेही अधिकारी दाखल झाले नव्हते.रात्री 9 वाजेच्या सुमारास संबधीत अधिकारी दाखल झाले.रात्री उशिरा याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वायरमन जाधव याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.याबाबत “बातमी कट्टा” न्युज पोर्टलचे प्रतिनिधी समाधान ठाकरे यांनी नंदुरबारचे पोलीस अधिक्षक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देखील या घटने बाबत दुख व्यक्त केले.

पी आर पाटील,पोलीस अधीक्षक,नंदुरबार….

गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया स्वाभाविक आहेत परंतु कायदा हातात न घेता पोलीसांना सहकार्य करावे. या घटनेसाठी जे दोषी असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत आहोत. मयताच्या कुटुंबाप्रती मला व्यक्तिशः सहानुभूती आहे. गावकऱ्यांना सांत्वनपर भेटणार आहे.

WhatsApp
Follow by Email
error: