बातमी कट्टा:- मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 वरील सावळदे तापी नदी पुलावरून अज्ञात तरुणाने तापी नदीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार आज दि 17 रोजी शिरपूर तालुक्यातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र 3 वरील तापी नदी पुलावर सायंकाळी 5:20 वाजेच्या सुमारास एम.एच 19 बिवी 9857 क्रमांकाची बजाज डिस्कव्हर मोटारसायकलवर आलेल्या तरुणाने तापी नदीत उडी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे.रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रवाशींना प्रत्यक्ष तापीत उडी घेतांना तरुण दिसून आला. घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून तापीत उडी कोणी व का घेतली याबाबत मात्र अद्याप माहिती मिळु शकलेली नाही.
