बातमी कट्टा:- शिरपूर येथे पत्रकारावर जिवघेना हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज दि 17 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली असून शिरपूर शहर पोलीस स्टेशनात कंत्राटी इंजिनिअरसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर येथील दैनिक समाजशक्ती वृत्तपत्राचे संपादक ईश्वर बोरसे हे शिरपूर शहर पोलीस स्टेशन बाहेर बातमी घेतल्यानंतर चहाच्या दुकानावर चहा पित असतांना त्या ठिकाणी पंचायत समिती येथील कंत्राटी इंजिनिअर दिगविजय ठाकरे रा.शिरपूर हा व त्याच्या सोबत असलेले अनोळखी तीन इसम आले व जोरजोरात आपसात राडा करू लागले व त्यामधील कंत्राटी इंजिनिअर दिग्विजय ठाकरे हा पत्रकार ईश्वर बोरसे यांना बोलला की तु पंचायत समितीचे कामकाज विषयी का बातमी लावत असतो असे म्हणून त्याने पत्रकार ईश्वर बोरसे यांची कॉलर पकडून मागे पुढे ओढत खाली पाडले व गळा दाबत शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच त्याच्या सोबत असणारे इतर तिघांनी हाथाबुक्यांनी मारहाण करत दिग्विजय ठाकरे याने गळा दाबल्याने पत्रकार ईश्वर बोरसे यांनी आरडाओरडा केल्यानंतर नितीन जाधव व विजय कोळी यांनी त्यांच्या तावडीतून पत्रकार ईश्वर बोरसे यांची सुटका केली.या झटापटीत पत्रकार ईश्वर बोरसे यांच्या वरच्या खिशातील 700 रुपये खाली पडले तसेच सँमसंग मोबाईल फुटला. यावेळी पत्रकार ईश्वर बोरसे यांना उपचारासाठी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत पत्रकार ईश्वर बोरसे यांनी इंजिनिअर दिग्विजय ठाकरे सह ईतर तिघांविरुध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.