बातमी कट्टा:- बँकेत दरोडा टाकण्याचा उद्देशाने आलेल्या दरोडेखोराने बँकेच्य सिक्युरिटी गार्डच्या डोळ्यात चटणी पावडर फेकून लोखंडी हत्याराने डोक्यावर व हातावर वार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली.यात सिक्युरिटी गार्डला डोक्यात व हातावर गंभीर दुखापत झाली आहे.मारहाणीचा हा व्हिडीओ सी.सी.टी.व्ही फुटेज मध्ये चित्रीत झाला आहे.
शिरपूर दि पीपल्स बँकेच्या शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मधील मुख्य शाखेत रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या अज्ञात दरोडेखोराने सिक्युरिटी गार्डच्या डोळ्यात मिरची पूड फेकत टॉमीने मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास घडली असून सुरक्षा रक्षकाने आरडा ओरड केल्यानंतर संशयित दरोडेखोर घटनास्थळा वरून पसार झाला असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याबाबत दि 17 रोजी शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी सिक्युरिटी गार्ड योगेश संजय पाटील, वय ३० रा निमझरी नाका यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरपुर शहरातील महाराजा कॉम्प्लेक्स मधील दि शिरपुर पिपल्स को बैंक लि.च्या मुख्य शाखेत १६ जानेवारी २०२२ रोजी संधाकाळी ७.०० वाजेपासुन ते दिनांक १७ जानेवारी २०२२ रोजी सकाळी ७.०० वाजेपर्यंत सिक्युरिटी गार्ड म्हणुन योगेश पाटील बैंक व बँकेचे एटीएम मशीनवर देखरेख करीत असतांना १७ जानेवारी २०२२ रोजी रात्री २.०० वाजेच्या सुमारास तोंडाला व डोक्याला कापडी रुमाल बांधलेला अनोळखी व्यक्तीने जवळ येऊश अचानक डोळ्यात तिखट पावडर टाकत लोखंडी स्टॉमीने डोक्यावर व हातावर मारहाण केली यात सिक्युरिटी गार्ड यांनी जोरजोराने आरडा ओरड केल्याने कॉम्प्लेक्स मधील लोकांनी धाव घेतली.यावेळी दरोडेखोर संशयित घटनास्थळा वरून पसार झाला असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दाखल फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी घटनास्थळा वरून सीसीटीव्ही फुटेज शहर पोलीसांनी गोळा केले असून तपास सुरू केला आहे.
