पोलीसांनी ताब्यात घेताच त्याने चोरीचे चार मोबाईल केले परत…

बातमी कट्टा:- विटभट्टी मजुर कुटुंब झोपले असतांना रात्री अंधाराचा फायदा घेत चार मोबाईल घेऊन पसार झालेल्या संशयिताला पोलीसांनी अवघ्या तीन ते चार तासात ताब्यात घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत संशयिताविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ बातमी

शिरपुर शहरालगत असलेल्या खर्दे शिवारातील शनिमंदिर जवळ अरुणावती नदी पात्रातील वीटभट्टीवरील कामगारांच्या झोपडीतून 4 मोबाईल चोरीस गेल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयितास अवघ्या काही तासातच ताब्यात घेतल्याची कारवाई शहर पोलिसांनी 26 जानेवारी रोजी केली आहे.याप्रकरणी विजय उर्फ पिंटू गोरख साळवे रा.वडाळी ता.शहादा जि नंदुरबार असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.त्याने गुन्ह्याची कबुली देत चारही मोबाईल काढून पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.याबाबत शहर पोलीस स्टेशनात सकाळी प्रताप पावरा याने तक्रार दाखल केली होती.अरुणावती नदी पात्रातील वीटभट्टीवर कामगार असलेले प्रताप सुकलाल पावरा,मुकेश मन्साराम भिल, मयूर मुकेश भिल,पिंटू बासकुले पावरा या कामगारांचे 15 हजार रुपये किमतीचे चार मोबाईल अज्ञाताने चोरून नेल्याची तक्रार दिल्याने 26 जानेवारी रोजी सकाळी अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर अवघ्या काही तासातच संशयित विजय गोरख साळवे यास मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची कामगिरी शहर पोलिसांनी केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांनी रात्री दिली आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव,व शिरपुरउप विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख,शिरपुर शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथकाचे पोहेकॉ ललित पाटील,लादूराम चौधरी,पोकॉ गोविंद कोळी, विनोद अखडमल,प्रविण गोसावी,मनोज दाभाडे,मुकेश पावरा, अनिल अहिरे व प्रशांत पवार यांनी केली.

व्हिडीओ बातमी

WhatsApp
Follow by Email
error: