
बातमी कट्टा:- शेतकऱ्याकडून गहू व हरभरा विकत तर घेतला मात्र त्याचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील चांदपुरी येथील शेतकरी किरण नरोत्तम पटेल यांनी गतवर्षी २९ मार्च ते १० एप्रिल या कालावधीत गहू व हरभरा नंदुरबार येथील झुबेर अहमद शेख अब्बास खाटीक, पप्पू झुबेर खाटीक व इम्रान झुबेर खाटीक सर्व नंदुरबार या व्यापारींना विकला होता.त्यापोटी शेतकरी किरण पटेल यांचे १५ लाख ६७ हजार २४० रुपये घेणे बाकी होते.ही रक्कम देण्यास संशयित व्यापारी नऊ महिन्यांपासून टाळाटाळ करीत होते. अखेर किरण पटेल यांनी तिघांविरुध्द शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरुन संशयित झुबेर अहमद शेख अब्बास खाटीक,पप्पू झुबेर खाटीक व इम्रान झुबेर खाटीक सर्व रा.हनुमान पेट्रोल पंप जवळ श्रीराम नगर नंदुरबार यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
