व्हिआयपी कारने वाहतूक होत असतांनाच पोलिसांची कारवाई,18 लाखांचा मुद्देमाल जप्त…

बातमी कट्टा:- पत्र्याच्या शेडमध्ये विदेशी दारु साठवून ती विदेशी दारु व्हिआयपी गाडीतून गुजरात राज्यात वाहतुक केली जात असल्याची माहिती प्राप्त होताच पिंपळनेर पोलीसांनी शिताफीने छापा टाकत 18 लाख 80 हजार 720 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपणीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे निरीक्षक सचिन साळुंखेंसह पथकाने धामंदर गाव शिवारातील विरखेल धरणाच्या बाजुला पत्र्याचे शेडमध्ये छापा टाकला यावेळी तेथे संशयित संदिप राजकुमार शर्मा वय 24 रा. हरियाणा व प्रकाश मोहने बागुल वय 23 रा. पिंपळनेर हे एम.एच 43 ए.बी 4111 क्रमांकाच्या फॉर्च्युनर कारच्या डिक्कीतमध्ये विदेशी दारु भरून जात असतांना त्यांना पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सलीमभाई ऊर्फ विक्कीभाई यांच्या मदतीने माल खरेदी करुन पत्र्याचे शेडमधून मद्यसाठा गुजरात राज्यात विक्री करण्यासाठी चोरटी वाहतुक करुन घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलीसांनी 15 लाखांच्या पांढऱ्या रंगाच्या फॉरच्युनर कारसह 18 लाख 80 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.सदरची कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सा.पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे,प्रदिप सोनवणे,प्रकाश सोनवणे, मनोज शिरसाठ,विशाल मोहने,दत्तु कोळी,राकेश बोरसे, मकरंद पाटील, विजय पाटील, सोमनाथ पाटील, दावल सैंदाणे,पंकज वाघ आदींनी कारवाई केली आहे.

WhatsApp
Follow by Email
error: