बातमी कट्टा:- आज दि 3 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास लग्न घरात स्वयंपाकाचे काम सरु असतांना अचानक गॅस जवळ आगीने भडका घेतल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.या भीषण आगीत घरसंसारी साहित्यासह रोख रक्कम सोने चांदीच्या दागिने जळून खाक झाले आहे. यात सुमारे 16-17 लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने यात जिवीतहानी टळली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील पाटण येथील कोमलसिंग गुलझारसिगं राजपूत यांच्या येथे लहान मुलीचे दि 6 रोजी लग्न कार्य आहे.घरात नातेवाईकांची गर्दी जमा झाली होती.आनंदी वातावरणात लग्नाची धावपळ सुरु होती.आज दि 3 रोजी सायंकाळी नेहमी प्रमाणे घराच्या वरच्या मजल्यावर स्वयंपाकाचे काम सुरु असतांना अचानक गॅसने भडका घेतला यात स्वयंपाक घरातील महिला घाबरून बाहेर आल्यानंतर संपूर्ण घरात आगीने पेट घेतला.या घरात सोने चांदीचे दागिन्यांसह,घरसंसारी साहित्य व लग्नासाठी असलेले पैसे जळून खाक झाले.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांनी धाव घेत आग नियंत्रणाचा प्रयत्न करत असतांना आगीने रौद्ररूप धारण केले होते.घटनास्थळी शिंदखेडा नगरपंचायतीची एक अग्निशमन बंब दाखल होत आग आटोक्यात आणली.सुदैवाने घटनास्थळी कोणालाही दुखापत झालेली नाही.या घटनेमुळे काही काळ पाटण गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.या घटनेत अंदाजे 15 ते 16 लाखांचे नुकसान झाल्याचे सांगितले जआत आहे.