बातमी कट्टा:- फॅक्टरीत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी घडली.अग्निशमन बंबाच्या मदतीने आग आटोक्यात आणली मात्र या आगीत 15 ते 16 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिरपुर तालुक्यातील करवंद येथील सनस्टार स्टार्च फॅक्टरीच्या बायलर सेक्शन मधील कोळशाला दि 7 रोजी पहाटेच्या सुमारास अचानक आग लागली.आगीने रौद्ररूप धारण करत बायलर सेक्शन मधील पी.यु.टयुब,सॅन्सर कनेक्टर,एच.डी.पी.ई.लाईन, झीरो स्पीड सेंन्सर,ऑप्टीकल फायबर केबल,एअर कॉम्प्रेसर पीप,शिल्डेड केबल,मशीन मेंन्ट. मधील बेल्ट व बेरींग तसेच इलेक्ट्रीक संपुर्ण वायर, बायलर मधील कोळसा,केबल,आयरन पत्रे, बेरींग, अँगल, पटटी,चेंनल व इतर मटेरीयलचे जळुन नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच शिरपुर वरवाडे नगरपालिकेचे अग्निशमन दलाच्या मदतीने दुपारी 1 वाजेपर्यंत आग विझवली.आग एवढी भीषण होर्ती की पहाटे 5 वाजेच्या सुमारास लागलेली आग दुपारी 1 वाजेपर्यंत विझविण्यात आली. याप्रकरणी सनस्टार स्टार्च कंपनीच्या एच.आर. डिपार्टमेन्टचे मॅनेजर प्रफुल्ल शरद दिक्षीत यांनी बुधवारी फिर्याद दाखल केल्याने शहर पोलीस ठाण्यात अग्निउपद्रवाची नोंद करण्यात आली असून शहर पोलीस पुढील तपास करीत आहे या आगीत अंदाजे 15 ते 16 लाखाचे साहित्याचे नुकसान झाल्याचा अंदाज कंपनीचे मॅनेजरने ललित मणियार यांनी व्यक्त केला आहे.