
बातमी कट्टा समाधान ठाकरे:-शिवीगाळ केल्याच्या कारणावरून डोक्यात लोखंडी रॉडने वार करत तरुणाचा खून केल्याची खळबळजनक घटना दि 12 रोजी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास घडली असून संशयित तरुणाला ताब्यात घेतले.
राहुल भाईदास तिरमले वय २१ रा. गोपालपुरा जवळील शाळा नंबर एकच्या मागे दोंडाईचा यांनी फिर्यादी दिली आहे.
दि.१२ रोजी रात्री नऊ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान दोंडाईचा येथील वरवाडे भागातील तिरमले गल्लीत दि 12 रोजी साडेनऊच्या सुमारास सागर राजेंद्र तिरमले वय 25 व अरुण संतोष तिरमिले वय 25 दोघांमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले.यावेळी सागर तीरमले याने अरुण याला पत्नीवरुन शिवीगाळ केली.शिवीगाळ केल्याने दोघांमध्ये मारहाण सुरु झाली.सागरने अरुणच्या अंगावर बसून लोखंडी रॉडने डोक्यावर वार केले.घटनास्थळी ईतरांनी धाव घेत अरुण तिरमले याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासून वैद्यकीय अधिकारी यांनी अरुण तिरमले याला मयत घोषित केले.शिवीगाळ केल्यावरून झालेल्या वादाऐ सागर राजेंद्र तिरमिले याने अरुण संतोष तिरमिले याच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून जीवे ठार मारले अशी फिर्याद दोंडाईचा पोलीस स्टेशनात देण्यात आली असून संशयित सागर तिरमलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्ह्याचा पुढील तपास पो नि दुर्गेश तिवारी करीत आहेत.
