जि.प.सदस्य अभिलाषा पाटील यांच्या मदतीने मंजूर झालेल्या वर्गखोलीचे काम पुर्ण,डॉ तुषार रंधे व भूपेशभाई पटेलांच्या हस्ते उदघाटन…

बातमी कट्टा:- शिरपूर तालुक्यातील बोरगांव येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील वर्गखोलीचे उद्घाटन प्रियदर्शिनी सूतगिरणीचे चेअरमन श्री भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली, जि प अध्यक्ष डॉ तुषारभाऊ रंधे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शाळेतील जुनी वर्ग खोली गळती, पडीत व जीर्ण झाली होती. बऱ्याच वर्षापासून शाळेतील विद्यार्थी वर्गखोली अभावी एकाच वर्गात बसत होते.म्हणून बोरगाव उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया व ग्रामस्थांनी जि. प. सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांना विनंती केल्यावर सदरहू वर्ग खोली धुळे जि प शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील यांच्या शिफारशीने शिक्षण समिती निधीतून मंजूर करण्यात आली.तसेच एका वर्ग खोलीची दुरुस्ती देखील करण्यात आली.जून २०२१ मध्ये वर्गखोली बांधकामाचे भूमिपूजन कारखाना संचालक तथा पं स माजी सदस्य भरत भिलाजी पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते.

याकामी राज्याचे माजी शिक्षण मंत्री श्री अमरिशभाई पटेल, आमदार श्री काशिराम पावरा, जि.प. अध्यक्ष डॉ तुषार रंधे, धुळे जि.प. शिक्षण सभापती सौ मंगला सुरेश पाटील, मा नगरसेवक श्री अशोक कलाल, वनावल गट जि प सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील यांची मदत लाभली.

उद्घाटन प्रसंगी शिसाका संचालक भरत भिलाजी पाटील, पं स सदस्या सौ विठाबाई निंबा पाटील, मा पं स उपसभापती जगतसिंग राजपूत, बोरगाव उपसरपंच तथा सरपंच महासंघ तालुकाध्यक्ष योगेंद्रसिंग सिसोदिया, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, मार्केट कमिटी संचालक बाबा पाटील, पोलीस पाटील मनोहर पाटील, जयसिंग राजपूत, डी. जे. राजपूत, ठेकेदार मेहुल राजपूत व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन बी.डी सिसोदिया सरांनी तर आभार प्रदर्शन उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी केले.

WhatsApp
Follow by Email
error: