रस्त्यालगत आढळला मृतदेह…

बातमी कट्टा:- शिरपुर शहरातील खंडेराव महाराज मंदिरालगत भिकन शाह बाबा दर्ग्याजवळ बायपास रस्त्यावर 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 60 वर्षीय ईसमाचा मृतदेह आढळून आला आहे. खंडेराव महाराज यात्रोत्सव परिसरात मृतदेह आढळून आल्याने नागरिकांनी पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ नारायण मालचे,पोना गणेश सोनवणे,विनोद सरदार, पोकॉ अमोल पगारे,पोकॉ सनी सरदार यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता सदर मृतदेह हा चादर पंघरलेल्या स्थितीत आढळून आल. जवळच बिस्कीट पाकीटे होती. सदर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला याबाबत शोधाशोध केल्यानंतर सदर मृतदेह हा शिरपूर शहरातील जनता नगर भागातील ओंकार सोनार यांचा असलयाचे निष्पन्न झाले.मयत ओंकार सोनार यांच्या नातेवाईकांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल होऊन मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.

WhatsApp
Follow by Email
error: