बातमी कट्टा:- पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पत्नीने देखील आपल्या माहेरी शेतातील झाडाला गळफास घेऊन जिवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर तालुक्यातील बोराडी येथील विजय सुखदेव भिल यांनी 18 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती.त्या घटनेनंतर विजय भिल यांची पत्नी सुनीता विजय भिल वय 22 यांचा देखील 20 फेब्रुवारी रोजी आपल्या माहेरी तालुक्यातील बलकुवे येथील एका शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संदीप मुरकुटे,महिला पीएसआय छाया पाटील, सहाय्यक पोलीस उप निरीक्षक जी डी पावरा,पोना गणेश सोनवणे, राजेंद्र एंडाईत पोकॉ चंपालाल पावरा यांनी भेट दिली.यावेळी सुनीता विजय भिल यांचा बलकुवे शिवारातील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह लटकलेला आढळून आला होता.याबाबत शिरपूर शहर पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आली आहे.
पतीने 18 फेब्रुवारी रोजी आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर पती पाठोपाठ पत्नीने माहेरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.