
बातमी कट्टा:- तोतया पोलीस असल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या संशयिताचा शिरपूर न्यायालयात मोठा हाय होलटेज ड्रामा बघावयास मिळाला.आणखी एक गुन्ह्यात अडकण्याचा इशारा मिळताच साथीदारांच्या मदतीने त्या ईरानी गँगमधील संशयिताने बेशुध्द होण्याचा ड्रामा केला.तोंडातून लाळ बाहेर फेकत धापा टाकू लागला सर्वत्र धावपळ उडाली, संशयित मृत्यूमुखी पडल्याचा महिलांनी आक्रोश केला. पोलीसांनी संशयिताला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्या संशयिताचा ड्रमा उघड झाला. वैद्यकीय तपासणीत तो ठणठणीत असल्याचे सजले त्यानंतर यावल पोलीसांनी शिरपूर पोलीसांकडून ताब्यात घेतले.

शिरपूर येथील करवंद नाका परिसरात दोन संशयितांनी(इराणी गँग) पोलीस असल्याचा बनाव करत वृध्दाची फसवणूक केली होती.त्या दोघांना धुळे शहरातील चाळीसगाव चौफली जवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत शिरपूर शहर पोलीसांच्या ताब्यात दिले होते.संशयित जफर हुसेन हजन हुसेन रा.परळी व जावेद अली नौशाद अली रा.भुसावळ यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आले होते.यावेळी दोन्ही संशयितांच्या कुटुंबातील महिला मोठ्या संख्येने यावेळी न्यायालय परिसरात हजर होते.

त्या दोन्ही संशयितांचा आणखी काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याच्या संशयावरुन जळगाव जिल्ह्यातील यावल पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी न्यायालय परिसरात उपस्थित झाले होते.दोघा संशयितांना जामीन मिळाल्यानंतर यावल पोलीस ताब्यात घेणार होते. यावेळी दोन्ही संशयितांना मा.न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला.त्यांना आणखी एक गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी यावल पोलीस आल्याचे संशयिताच्या कुटुंबातील महिलेने संशयितांना ईशारा देऊन सांगितले.
त्यानंतर दोघांपैकी एक जावेद अली या संशयिताने तोंडातून लाळ बाहेर फेकत धापा टाकून श्वास अडकल्याचा बनाव करुन जमिनीवर लोळण घातली.याच वेळी त्या महिलांनी आक्रोश करत संशयित जावेद अली मृत्युमुखी पडल्याचा जोरजोलाने आक्रोश केला.सर्वत्र धावपळ उडाली पोलीसांंनी तात्काळ त्याला शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र वैद्यकीय तपासणी नंतर संशयित अली ठणठणीत असल्याने जावेद अलीने सहकार्यांसोबत केलेला हाय होलटेज ड्रामा उघड झाला.आणि अखेर यावल पोलीसांनी दोघांना ताब्यात घेतले.