बातमी कट्टा:- ऊस भरून येणाऱ्या भरधाव आयशरने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिल्याने ऊसाखाली दाबल्या गेल्याने ट्रॅक्टर मधिल एकाचा जागिच मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाल्याची घटना आज 23 फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास सुमारास घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार मुंबई – आग्रा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात घडला आहे.धुळ्याकडून ऊस भरून मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या भरधाव आयशरने शिरपूर तालुक्यातील कुरखळी येथून येणाऱ्या ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.या भीषण अपघातात ऊसाखाली दाबल्या गेल्याने ट्रॅक्टर मधील अर्जुन हसरत भील वय 30 रा. कुरखळी यांचा जागिच मृत्यू झाला तर राजु पुजु भिल वय 32 वर्ष,छगन बळीराम भिल वय 42 वर्ष,दयाराम देवराम भिल वय 46 वर्ष,भाईदास रामदास भिल वय 45 वर्ष यांच्यासह आयशर चालक राहुल जाजुराम जाधव वय 26 असलपुर ता.महु जि.इंदौर जखमी झाले आहेत.जखमींना शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.