बातमी कट्टा:- शालकाच्या साखरपुड्यासाठी लहान मुलाला सोबत घेऊन मोटरसायकलीने जात असतांना भरधाव डंपर व मोटरसायकलीचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.यात मोटारसायकल स्वार पिता पुत्राचा मृत्यू झाला आहे.हा अपघात ईतका भीषण होता की यात मोटरसायकलवरील एकाचे मस्तक धडा वेगळे झाले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिंदखेडा तालुक्यातील देवाचे विखरण येथील विनोद हिम्मतसिंग राजपूत
हे सुरत (गुजरात) येथे कामानिमित्त वास्तव्यास होते.ते दोन दिवसापूर्वी सुरत येथून आपल्या गावी विखरण येथे आले होते.आज दि 4 मार्च रोजी विनोद राजपूत यांच्या शालकाच्या साखरपुड्यासाठी विनोद राजपूत हे त्यांचा लहान मुलगा (कृष्णा)वकील विनोद राजपूत याच्या सोबत विखरण येथून चिमठाणे येथे मोटारसायकलीने जात असतांना रस्त्यादरम्यान भडणे फाट्याजवळ भरधाव डंपर वाहन आणि मोटरसायकलीचा अपघात झाला यात विनोद राजपूत यांचा जागिच मृत्यू झाला.तर मुलगा गंभीर जखमी झाला होता. घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरीकांनी धाव घेत मुलगा कृष्णा (वकील) विनोद राजपूत याला रुग्णालयात दाखल केले.तेथून धुळे येथे घेऊन जात असतांना मुलगा कृष्णा(वकील) याचा देखील मृत्यू झाला आहे.हा अपघात ईतका भीषण होता की यात विनोद राजपूत यांची मस्तक धडावेगळे झाले होते.डंपर वाहनाला शिंदखेडा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.