बातमी कट्टा:- एसटी वाहकाला अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी नातेवाईकांसह शिरपूर आगार महामंडळ कर्मचारी दाखल झाले आहेत.परिवहन मंत्री यांनी शक्तीने हजर राहण्याचे आदेश दिल्याने त्या चिंतेत असतांना त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे नातेवाईकांनी आरोप केले आहेत.न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा घोषणा नातेवाईकांनी यावेळी दिले आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शिरपूर आगार येथे आरीफ शेख हसन मुजावर वय 53 हे चालक म्हणून कार्यरत आहेत ते आंदोलनात सहभागी होते.आज दि 7 रोजी आरीफ शेख घरी असतांना सायंकाळच्या सुमारास त्यांना अचनाक छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती प्राप्त होताच घटनास्थळी नागरिकांसह शिरपूर आगारातील कर्मचारी दाखल झाले.नातेवाईकांनी आरोप केला की दि 1 फेब्रुवारी रोजी कर्मचाऱ्यांना आरोपत्राची नोटीस बजाविण्यात आली होती.कर्मचाऱ्यांचा न्यायालयानी लढा सुरु असतांना परिवहन मंत्री यांनी दि 4 रोजी जाहीर सांगितले की दि 10 मार्चच्या आत कर्मचारी कामावर हजर न झाल्यास आमच्यासाठी मार्गमोकळेळ आहेत.त्या विवंचनेत आरीफ शेख होते आज सायंकाळी घरी असतांना त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा नातेवाईकांनी घोषणा केल्या आहेत.नातेवाईकांनी रात्री 9 वाजेच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस स्टेशन गाठले होते.