बातमी कट्टा:- भाचीच्या लग्नाच्या कामासाठी मित्रासोबत मोटारसायकलीने येत असतांना भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकल पुलाखाली पडल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार दोंडाईचा पासून एक किमी अंतरावर नंदुरबार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जण ठार झाले आहेत. म्हसाळे (ता. साक्री) येथील रहिवासी लक्ष्मण नाना बेडसे हे गुजरात राज्यातील बारडोली येथे स्थायिक असून खाजगी कंपनीत काम करतात ते रंजाणे (ता. शिंदखेडा) येथे भाचीच्या लग्नाच्या कामासाठी बारडोलीहून मोटारसायकलीने येत असताना दोंडाईचा पासून एक किमी अंतरावर रामी महादेव मंदिराजवळ जी जे 19 बी एफ 1989 क्रमांकाच्या मोटारसायकलीला रात्री 11 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या जोरदार धडक दिल्याने मोटारसायकल पुलाखाली कोसळली.रात्री अपघात झाल्याने रात्रभर दोघेही जखमी अवस्थेत पडून राहिल्याने वेळेवर उपचार न मिळाल्याने लक्ष्मण नाना बेडसे वय 34 व त्यांचा मित्र अनिल गोकुळ वासवा वय 30 यांचा मृत्यू झाला. याबाबत पोलीस स्टेशनात नोंद करण्यात आले आहे.
