बातमी कट्टा:- पोलीसांना पाहून लपणाच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.रात्रीची पेट्रोलींग सुरु असतांना मध्यप्रदेश येथील युवकाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
दि 9 रोजी रात्रीच्या सुमारास शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे सा पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांचे पोलीस पथक गस्तीवर असतांना मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील दहिवद गावातील ग्रामपंचायतीच्या कमानीआड काही हालचाल सुरू असल्याचे पोलीसांना आढळले.तो पळून जाण्याच्या तयारीत असतांनाच पोलीसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.यावेळी त्याने तोंडावर कापड बांधले होते.त्याला विचारपूस केली असता त्याने बोलण्यास टाळाटाळ केली.पोलीसांनी प्रसाद देताच त्याने त्याचे नाव जानू जानीवॉकर सोलंकी वर 18 रा जयपालपूर तालुक्यातील रावत येथील असल्याचे सांगितले.पोलीसांकडुन त्याची कसून चौकशी सुरु आहे.