बातमी कट्टा:- आंदोलनात सहभागी असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एका कर्मचारीने विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.धुळे आगारातील त्या चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचारीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातील चालक रविंद्र रघुनाथ पवार या कर्मचारीने विषारी द्रव्य प्राशन करून शनिवारी रात्री आत्महत्याचा प्रयत्न केला.त्यांना तात्काळ धुळे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.चालक रवींद्र पवार यांची प्रकृती चिंताजनक आहे.
रवींद्र पवार यांच्या नातेवाईकांनी सांगितले की,गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. यात रवींद्र पवार हे देखील शामील आहेत.यामुळे वेतन बंद असल्याने घरखर्च भागवणे शक्य होत नसल्याने रवींद्र पवार चिंतेत होते.त्या चिंतेत त्यांनी आज विषारी औषध प्राशन केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.